बालेवाडी येथे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रिक्षाचालकांचा विमा…!

0

बालेवाडी :

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने ५१,००० वृक्ष लागवड करण्याचे अभियान आज शहरभर राबविण्यात येत आहे. भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश बालवडकर यांच्या माध्यमातून लक्ष्मीमातानगर (बालेवाडी) येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम वारकरी संप्रदायातील मान्यवर संत तुकाराम महाराजांचे १०वे वंशज पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माधवीताई निगडे, यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सुस म्हाळुंगे बाणेर बालेवाडी या भागातील रिक्षावाले काका यांच्यासाठी मोफत अपघात विमा योजना चालू करण्यात आली. आज ५१ वृक्षरोपण व ५१ रिक्षावाले काका यांना विमा काढून देण्यात आला.

याची माहिती देताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, भाजपा पुणे शहर यांच्या वतीने 51 हजार वृक्ष लागवड करण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यास हातभार लागावा या हेतूने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. यासाठी केवळ देशी झाडांची निवड केली असून आपल्या पुढच्या पिढीला आपली देशी झाडे माहिती व्हावी हा त्यामागचा हेतू आहे असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, प्रभागातील रिक्षाचालकांना बिकट आर्थिक परिस्थिती मधून जावे लागत आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता मोफत दोन लाखाचा अपघाती विमा ही योजना आज सुरु करत आहे.

या वेळी पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, भाजपा सदस्या मयुरी प्रणव बालवडकर, पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माधवी निगडे, नगरसेविका ज्योती कळमकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत सदस्य राजेंद्रजी सारंगे यांच्या हस्ते सुभाष भोळ, शिवम बालवडकर, प्रशांत बालवडकर, बाळासाहेब बालवडकर, बजरंग टकले, राजेंद्र कविटकर, शिवराज बालवडकर, शाम बालवडकर, प्रतिक बालवडकर, विकास बालवडकर, बालाजी पाटील, शाम बालवडकर, सोमनाथ बालवडकर आदी बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात झाली.

See also  नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने स्वखर्चाने टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार..!