सुस ग्रामपंचायत उपसरपंच पदी दिशा अनिल ससार यांची बिनविरोध निवड!

0

सूस : प्रतिनिधी :-

सुस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिशा अनिल ससार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच दिपाली पारखी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. रिक्त झालेल्या पदी दिशा ससार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब चांदेरे व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर सुसगावच्या सरपंच अपुर्वा निकाळजे, माजी सरपंच नारायण चांदेरे, माजी उपसरपंच गणेश ससार, ग्रामपंचायत सदस्य सचिन चांदेरे, गणेश साळुंके, गजानन चांदेरे, अनिकेत चांदेरे, मारूती निकाळजे, शुभांगी ससार, सिमा निकाळजे, खादी ग्रामउद्योग मुळशी तालुका अध्यक्ष सतीश चांदेरे, मिराताई देवकर, शांताबाई चांदेरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रोहिदास चांदेरे, उपाध्यक्ष बाळासाहेब भोते, सामाजिक कार्यकर्ते उत्तम ससार व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सुस ग्रामस्थांतर्फे नवनिर्वाचित उपसरपंच दिशा ससार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलत असताना नवनिर्वाचित उपसरपंच दिशा अनिल ससार यांनी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.

See also  स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वारद फाउंडेशनच्यावतीने ऑनलाइन नृत्य स्पर्धा संपन्न