रेकी करून दरोडा टाकणाऱ्या वर चतुःशृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत मोक्का कारवाई. 

0

पुणे :

चतुःशृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या वतीने पुणे शहरामध्ये जेष्ठ नागरिकांच्या घरामध्ये केअर टेकर राहून रेकी करून दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगार संदिप भगवान हांडे व त्याचे टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली.

या गुन्हयातील टोळी प्रमुख संदीप भगवान हांडे, (वय २५वर्षे, रा. पिंपळखेडा, पो. वाळुज, ता गंगापूर, जि. औरंगाबाद) याने आपले इतर पाच साथीदारांसोबत संघटीत टोळी तयार करून. त्याने व त्याचे साथीदार यांनी वृंदावन हौसिंग सोसायटी, पंचवटी,पाषाण, पुणे व सिंध हौसिंग सोसायटी येथे हातात कोयता, सुरा, काठी घेवून फिर्यादीचे घरात जबरदस्तीने प्रवेश करुन, घरातील कामगार याचे पायावर काठीने व कोयत्याने मारुन जखमी करुन फिर्यादी व कामगार यांचे हात व तोंड कापडाने बांधले व घरातील सर्व साहित्य विस्कटून किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम जबरीने चोरुन नेले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्यामध्ये (१) संदीप भगवान हांडे, वय २५ वर्षे, रा. पिंपळखेडा, पो. वाळुज, ता गंगापूर, जि. औरंगाबाद (२) मंगेश बंडु गुंडे, वय २० वर्षे, रा. वडीकाळया, पो सुकापुरी, ता अंबड, जि जालना (३) विक्रम दिपक थापा उर्फ बिके, वय १९, रा. विनयनगर, वृंदावन पॅराडाईज, इंदिरानगर, नाशिक (४) किशोर कल्याण चनघटे, वय २१, रा.मु.पिंपरखेडा, पो. वाळुज, ता गंगापूर, जि औरंगाबाद (५) भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण, वय २५, (६) भारत बद्रीनाथ चनघटे, वय २१वर्षेरा.मु.पिंपरखेडा, पो.वाळुज, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद वरील प्रमाणे अटक केलेल्या आरोपीतांकडून तीन मोटार सायकल, सोन्याचे हि-याचे दागिने, कॅमेरा असा एकुण किंमत रूपये २१,७५,०००/- चा माल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर अटक आरोपींकडून खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 

१. चतुःश्रृंगी पोस्टे गुरनं २१४/२०२१ भादविक ३९२. ३९७, ३४२, ४५२.५०६(२).३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५) 

२. चतुःश्रृंगी पोस्टे गुरनं १३३/२०२१ भादविक ३९५. ३९४, ४५२, ३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५)

See also  तपासासाठी अनिल भोसले यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.

अटकेतील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर पुणे,औरंगाबाद,जालना येथील विविध पोलीस ठाणेस एकुण ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,  पोलीस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, पुर्व प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पुणे शहर पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, परिमंडळ-०४, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस आयुक्त रमेश गलांडे खडकी विभाग,पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे चतुःशृंगी पो.स्टे पुणे, पोलीस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक प्रेम वाघमोरे, महेश भोसले, मोहनदास जाधव, अमलदार संतोष डोळस, अमित गद्रे, अमित छडीदार, सुधीर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, तेजस चोपडे, मुकुंद तारू, दिनेश गडाकुंश, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे यांचे पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास रमेश गलांडे, सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ३४ वी कारवाई असुन या वर्षातील ही २९ वी कारवाई आहे.