माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४३८ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

0

पाषाण :

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून पाषाण येथील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी, एक गाव एक गणपती आणि सनी निम्हण मित्र परिवारांच्या वतीने विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास विक्रमी 438 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्याकरता भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे पोपटराव जाधव आणि विठ्ठल सेवा मंडळाचे विश्वस्त खंडू आरगडे यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. या रक्तदान शिबिराचे आयोजन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी एक गाव एक गणपती आणि सनी निम्हण मित्र परिवारांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिवराज्याभिषेकाच्या औचित्य साधून कोरोना च्या भयभीत वातावरणातून लोकांना बाहेर काढून रक्तदान करायला लावायचे काम भाजप नेते सनी निम्हण यांनी केले हे कौतुक करण्यासारखे आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर नॉन कोविड पेशंट साठी रक्ताची गरज लागणार आहे. त्यामुळे सनी निम्हण यांनी चांगले काम केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सनी निम्हण यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, या रक्तदान शिबिरास रक्त संकलित करण्याकरता युवकांनी दाखविलेला उत्साह पाहता शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदानाची मानवंदना देण्याचे काम या रक्तदान मावळ्यांनी केले आहे. धमन्यांमध्ये वाहणारे रक्त हे वेळप्रसंगी रक्तदान करण्यासही मागेपुढे कचरत नाही, हे या रक्तदान शिबिरात युवकांनी दाखविलेला उत्साह पाहून सिद्ध होत आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. नगरसेवक शिवाजी बांगर, कोथरुड विभाग मंडल अध्यक्ष पूनित जोशी, शिवसेनेचे संजय निम्हण, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, स्विकृत सदस्य शिवम सुतार, काँगेस चे मंगेश निम्हण, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, औंध विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी, वस्ताद विकास रानवडे, सुप्रीम चोंधे, गणेश कलापुरे, पोपटराव जाधव, खंडू आरगडे, अमित रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  बाणेर येथील दुसऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहाणी