पुण्यातील सर्व दुकाने सोमवार पासून चार वाजे पर्यंत उघडी ठेवण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय

0

पुणे :

ब्रेक द चेनचे नवीन निकष जाहीर केल्यानंतर, पुण्यातील सर्व दुकाने येत्या सोमवारपासून (दि.७) चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे. दुकानांसोबतच रेस्टॉरंट, बार, फूडकोर्टही सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत पन्नास टक्के आसनक्षमतेने सुरू होणार आहेत.

सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस उघडी असतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार उघडी राहतील. शनिवार व रविवारी पूर्ण बंद राहतील.

  • रेस्टॉॅरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
  • दुपारी चारनंतर आणि शनिवार व रविवार ११ वाजेपर्यंत घरपोहोच सेवा सुरू राहणार आहे.
  • पुण्यातील सर्व उद्याने, खुली मैदाने चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील.
  • सर्व खासगी कार्यालये पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत होऊ शकणार आहेत.
  • लग्नसमारंभासाठी आता ५० लोकांना हजर राहण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
  • अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी यासाठी २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
  • विविध बैठका, सभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य सभा, निवडणुका ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • बांधकामाच्या ठिकाणी कामगार राहत असतील, तर दिवसभर कामास परवानगी आहे. मात्र, बाहेरून कामगार येणार असल्यास त्यांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी आहे. दुपारी चार वाजता त्यांना घरी जावे लागेल.
  • व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या ठिकाणी एसी वापरता येणार नाही.
  • पीएमपी बससेवाही सर्वांसाठी आसनक्षमेतच्या पन्नास टक्के क्षमेतेने सुरू राहणार आहे. प्रवासी उभे राहण्यास मनाई असेल.
  • दारूची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शनिवार, रविवार ही दुकाने बंद असतील.
See also  सामाजिक संघटनामध्ये सत्ता बदलाची ताकद आली पाहिजे : मुक्ता दाभोळकर