महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार : उदय सामंत

0

पुणे :

महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे. दरम्यान, पुढच्या वर्षीपासून शिवज्योत रॅली देखील प्रत्येक महाविद्यालयातून निघणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या पुण्यातील सीओईपी या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना नियमांचे पालन करुन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच पुढच्या वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयातून शिवज्योत रॅली काढली जाणार, असं देखील या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं आहे.

उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात आता शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे.

See also  तंत्र व शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइनच