एकपात्री नाट्य कलावंतांना मदत म्हणून अन्न धान्य किट वाटप : मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण निमित्त प्रकाश बालवडकर यांनी कोथरूड मध्ये घेतला उपक्रम! 

0

कोथरुड :

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून तसेच कोथरुड चे आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (१०जून) आम्ही एकपात्री महाराष्ट्र या कलाकारांच्या संघटनेच्या ५१ कलाकारांना प्रकाश बालवडकर ( प्रभारी सहकार आघाडी पुणे शहर, भाजपा ) बालवडकर पाटील व्हेंचर च्या संचालिका मयूरी प्रणव बालवडकर यांच्या वतीने विवेक वेलणकर ( अध्यक्ष सजग नागरिक मंच, पुणे ), व विजय गोखले (जेष्ठ विनोदी रंगकर्मी ) यांच्या शुभ हस्ते सेवा भाव अन्न धान्य किट वाटप करण्यात आले.

या वेळी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी रित्या स्वतःच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन करून सात वर्षे पूर्ण केले. पंतप्रधानांनी देशाला एक वेगळी दिशा दिली. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. तसेच कोरोनाच्या काळात देखील सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामाचा गौरव म्हणून, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सद्या कोरोनामुळे नाट्य गृह बंद असल्याने एकपात्री नाट्य कलावंतांना एक मदत म्हणून अन्न धान्य किट वाटप करीत असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

या प्रसंगी उद्योजक समीरजी पाटील, मंडल अध्यक्ष पुनित जोशी, गिरीष खत्री, शंतनू खिलारे, संतोष लांडे, महेश पवळे, शिवम बालवडकर, सौरभ अथनिकर, आदी कार्यकरते व सुनील महाजन, संवाद, पुणे तसेच मारुती यादव, अनुपमा खरे, वंदन राम नगरकर आणि बाळकृष्ण नेहरकर हे आम्ही एकपात्री, महाराष्ट्र संघटनेचे कलाकार सदस्य उपस्थित होते.

See also  'आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषद' मंगळवार रोजी कोथरुड येथे आँनलाईन होणार