कोल्हापूर येथे जाऊन चतु:शृंगी पोलिसांची धडक कारवाई. 

0

पुणे :

चतुःशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी आंदेकर टोळीतील दुहेरी मोक्का मध्ये फरारी असणाऱ्या कुप्रसिध्द गुन्हेगारांना कोल्हापूर येथून अग्निशस्त्र हस्तगत करून जेरबंद केले आहे. कोल्हापूर येथे जाऊन चतु:शृंगी पोलिसांनी धडक कारवाई करून पुन्हा एकदा महत्वाची कामगिरी बजावली आहे.

पोलीस आयुक्त,पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अमली पदार्थाचे विक्रीचे रैकेट, तसेच शरीर, मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करणे याबाबत आदेश सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना दिले आहेत.

वरील आदेशानुसार पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -४, पुणे शहर यांनी पोलीस स्टेशन हदीतील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत स्वतंत्र तपास पथक तयार केले होते.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपींची यादी तयार करून त्यामधील मोका, दरोडयातील सराईत आरोपी सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड व पंकज वाघमारे यांचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे चतु: श्रृंगी पोलीस स्टेशन तपासपथकातील अमलदार इरफान मोमीन व सुधीर माने यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की,पुणे शहरामधील मोक्का मध्ये फरार असणारे आरोपी नामे सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड व पंकज वाघमारे हे दोघे आदमापुर जि.कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे.

पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव यांचे नेतृत्वाखाली टिम तयार करुन त्यांना दिनांक १९/०५/२०२१ रोजी वरील नमुद पत्यावर कोल्हापूर येथे पाठविले असता सदर पथकाने अदमापुर याठिकाणी जावून आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून आरोपी नामे १.सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड वय २४ वर्षे रा.२२८,मंगळवार पेठ पुणे,२.पंकज गोरख वाघमारे वय २६ वर्षे रा.महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ,गाडीतळ हडपसर पुणे यांना दिनांक २०/०५/२०२१ रोजी कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अ.क्र.१ यास चतुःशृंगी पो.स्टे.गुन्हा रजि.२३/२०२१ भादवि कलम ३९९, ४०२ आर्म अॅक्ट ३(२५), ४(२५) म पो का क ३७(१) सह १३५, १४२ गुन्हयात अटक केलेली आहे.

See also  २३ ग्रामपंचायतीमध्ये सर्व शासकीय नियम डावलत बोगस नोकर भरती उघड.

आरोपी क्र.२ यास चतु श्रृंगी पो.स्टे गुरनं ०६/२०२१ भादविक ३९५,३८४,४२७, ५०६(२), महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३(१)(ii),३(२),३(४) या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी क्र.१ सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड याचेकडून दाखल गुन्हयामध्ये कि.रु.२०,४००/-चे एक गावटी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत.सदरचे आरोपी यांचेविरुध्द पुणे शहर परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाणीचे १५ गंभीर गुन्हे दाखल आहे.

आयुक्त परिमंडळ -४ पुणे शहर पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुःशृंगी पो.स्टे. राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, महेश भोसले, अमलदार सुधीर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, तेजस चोपडे, संतोष जाधव, मुकुंद तास, दिनेश गडाकुंश, प्रकाश आव्हाड, प्रमोद शिंदे, ज्ञानेश्वर मुळे यांचे पथकाने करून प्रशसनीय कामगिरी केली आहे.