आपल्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्यांच्या सुरक्षेची आपण काळजी घेऊया : सनी निम्हण. 

0

पाषाण :

सद्या कोरोना च्या वाढत्या प्रमाणामुळे प्रत्येक नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेविषयी दक्ष राहत आहे. प्रत्येक जण आपल्याबरोबर आपले कुटुंब सुरक्षित कसे राहील यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना काळात पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स संचालक, सफाई कामगार आणि प्रशासकीय कर्मचारी याप्रमाणेच सुरक्षा रक्षक हे पण फ्रन्ट लाईन वर्कर्स आहेत. सुरक्षा रक्षक आपल्या कुटुंबाच्या व आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात राहून सेवा देतात. अशा सोसायटी सर्वांच्या सुरक्षितेसाठी झटणाऱ्या सुरक्षारक्षकानसाठी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी एक आगळेवेगळे अभियान सुरू केले आहे.

निम्हण यांनी अनेक वेळा सामाजिक बांधिलकी जपून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या संकल्पनेतून नागरिकांची मदत केली आहे. यावेळी देखील त्यांनी दुर्लक्षित असलेल्या परंतु सोसायट्यांमध्ये असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची सुरक्षितता राहण्याकरता सदैव प्रयत्नशील असणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या सुरक्षिततेसाठी मदत म्हणून सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, फेस मास्क अशा सुरक्षितते साधनांचे देण्यासाठी एक विशेष अभियान सुरू केले आहे. पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी या भागातील सोसायट्या मधिल सुरक्षा रक्षकांना हे किट वाटप करत आहेत.

याप्रसंगी सनी निम्हण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हाऊसिंग सोसायटी मध्ये आपण घरात संसर्गापासून दूर राहावे यासाठी सुरक्षा रक्षक आपली जबाबदारी चोखपणे बजावतात. हे सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असले तरी ते सुद्धा एक माणूस आहेत. माणूस या नात्याने त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांना सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, फेस मास्क अशा साधनांची एक किट देण्यासाठी एक विशेष अभियान सुरू करत आहोत. खारीचा वाटा उचलून त्यांच्या योगदानास मानवंदना देण्याचा प्रयत्न आहे. “चला सुरक्षा रक्षकांसह सर्वांचीच काळजी घेऊया आणि या महामारीचे संकट परतवून लावूया !” असे त्यांनी यावेळी सांगितले.

See also  राज्यात तीन पक्ष असताना बाणेर मध्ये नागरिकांचा विकास हा एकच पक्ष : तापकीर