राज्यात तीन पक्ष असताना बाणेर मध्ये नागरिकांचा विकास हा एकच पक्ष : तापकीर

0

बाणेर :

राज्यात तीन पक्षाचे सरकार पण बाणेर मध्ये एकच पक्ष तो म्हणजे नागरिकांचा विकास. मकर संक्रांती दिवशी पुणेकरांनी संदेश घ्यावा असा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बाणेर मधील वाढत्या नागरीकरणाचे भान ठेवून तीनही नगरसेवक विकासाची कामे करत आहेत ही बाब खूप महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक व योगीराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी दिली.

बाणेर सुस कडे जाणाऱ्या भुयारी मार्ग दुचाकी व पादचारी साठी दुरुस्ती देखभाल नंतर सुरू करण्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे, विशाल विधाते, नितीन कळमकर, बबन चाकणकर पुणे महापालिकेचे जालिंदर चांदगुडे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर यांच्या उपस्थिमध्ये झाला. सदर कार्यक्रमा चे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक बाबूराव चांदेरे, भाजप नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या माध्यमातून झाले. तिन्ही नगरसेवकांनी राजकारण बाजूला ठेवून केवळ विकासा साठी एकत्रित रित्या हे काम पुर्ण करण्यास महत्व पुर्ण योगदान दिले.

नगरसेविका ज्योती कळमकर यांनी बोलतांना सांगीतले की, जिथे जिथे लोकांच्या अडचणी येतात तेंव्हा निश्चित पुढाकार घेऊन काम केले जाईल. लोकांना पावसाळ्यात येण्याजण्यात त्रास होत होता म्हणुन प्राधान्याने अंडर पास काम करण्यात आले.

स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी सांगीतले की, लोकांना जेंव्हा जेंव्हा अडचणी येईल त्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहू. पावसामध्ये निर्माण होणार प्रश्न या अंडर पास रोड मुळे सुटणार आहे.

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी सांगीतले की पावसाळ्यात लोकांना होणारा त्रास पाहून पक्ष भेद बाजूला ठेवून दोन्हीं नगरसेविकांच्या सहकार्याने हे काम करण्यात आले. या कामा वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी चांगली साथ देवुन काम करण्यास मदत केली त्यांचे आभार मानले.

बाणेर नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, नगरसेवकांनी चांगले काम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. बाबुराव चांदेरे यांनी रात्र दिवस उभे राहुन काम केले ते विकासाचे चाणक्य आहे असे संबोधले.

See also  अभिजीत दगडे मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छ व निर्जंतुकीकरण अभियानाचे उद्घाटन...!