सचिन तेंडुलकरने वाढदिवसाच्या निमित्त केला समाजोपयोगी संकल्प

0

मुंबई :

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने नुकतीच करोनावर मात केली. सचिनने आपल्या वाढदिवशी समाजाच्या उपयोगसाठी एक संकल्प करायचा ठरवला आहे. यावेळी सचिनचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सचिन हा गेल्या काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी क्रिकेट सीरिजमध्ये खेळला होता. ही स्पर्धा भारताने जिंकली. पण ही स्पर्धा संपवून घरी आल्यावर सचिनला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सचिनने करोनावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटल गाठले होते आणि त्याने करोनावर मात केल्याचे पाहायला मिळाले. आता सचिनने करोनावर मात करण्यासाठी एक गोष्ट करण्याचा संकल्प केला आहे.

सचिनने आपल्या या व्हिडीओमध्ये सांगितले की, ” मला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. पण त्यावर मी आता मात केली आहे. मी २१ दिवस विलगीकरणामध्ये होतो आणि त्यावेळी मला तुमच्या शुभेच्छांचा फायदा झाला.

त्याचबरोबर डॉक्टरांनी माझ्यावर चांगले उपचार केले. त्यानंतर डॉक्टरांनी मला एका गोष्टीची विनंती केली आणि तिच गोष्ट मी आता करणार आहे. मी आता प्लाझ्मा देणार आहे आणि तुम्हीही याचे दान करायला हवे. कारण जर करोनाबाधित रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळाला तर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट करणे फार महत्वाचे आहे. मी ही गोष्ट आता करणार आहे आणि समाजाच्या उपयोगासाठी तुम्हीही ही गोष्ट करायला हवी, अशी मी तुम्हाला विनंती करत आहे.”

सचिनला करोनाची बाधा झाल्यावर तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी टीकाही केली होती. सचिनसारख्या सेलिब्रेटींनी घरीच उपचार करावेत, जेणेकरून ज्या सामान्य लोकांना रुग्णालयाची गरज आहे त्यांना या गोष्टीमधून फायदा होऊ शकतो. पण या गोष्टीवर सचिनने आपले मत व्यक्त केले नव्हते. पण आता करोनाशी लढा देण्यासाठी जी गोष्ट महत्वाची आहे, ती गोष्ट आता सचिन करताना दिसत आहे. त्यामुळे आता सचिनच्या या विनंतीला त्याचे चाहते कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कारण जेवढे प्लाझ्माचे दान करता येईल, तेवढे नक्कीच करोनाच्या लढ्यात उपयोगी पडणार आहे.

See also  न्यूझीलंडच्या संघाचा टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकत नवा विक्रम

https://www.instagram.com/tv/COCnbB1gp50/?igshid=1shfkpl6l5njt