कोरोनाच्या विरोधात चालु लढाईमध्ये लसीकरण हे महत्त्वाचे हत्यार : आयुक्त विक्रम कुमार

0

बाणेर :

बाणेर मध्ये एक ही पुणे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र नसल्याने लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना लांबच्या अंतरावर जावे लागत होते. तसेच लसीकरणासाठी जास्त वेळ लागत असल्याने अनेक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने सदरचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या साठी बाबुराव चांदेरे यांनी मेहनत घेवुन अतीशय दुरावस्थेत असलेल्या बाणेर येथील सर्व्हे नं.१६४ येथील आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्यास लसीकरण करण्यास योग्य बनविले. अवघ्या चार दिवसात सर्व कामे पूर्ण करुन लसीकरण केंद्र उभे केले.

लसीकरण केंद्राचे उदघाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी लसीकरण केंद्राची पाहणी करून, खुप कमी वेळेत चांगल्या प्रकारचे लसीकरण केंद्र उभारणी केल्याबद्दल नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, आत्ताच्या काळात कोरोना झपाट्याने वाढत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.  सर्वांनी लस घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक नागरिक लसीकरणासाठी टाळाटाळ करताना दिसत आहे, कोरोनाच्या विरोधात चालू लढाईमध्ये लसीकरण हे खूप महत्त्वाचे हत्यार आहे, याचा उपयोग कोरोनाला हरवण्यासाठी सर्वानी केला पाहिजे. त्यामुळे लसीकरण हे सर्वांसाठी खुप महत्त्वाचे आहे असे, मत आयुक्तांनी व्यक्त केले.

लसीकरण केंद्र सुरू करण्याकरिता महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. वैशाली जाधव, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे या अधिकारी वर्गाने तसेच स्थानिक नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर या सर्वांनी मोलाचे सहकार्य व प्रयत्न केले. त्याबद्दल सर्वाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी आभार मानले.  बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पंचवटी, सुस, म्हाळुंगे या गावांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मध्यवर्ती लसीकरण केंद्र सुरू झाल्यामुळे या परिसरातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आभार मानले.

See also  बाणेर नागरी पतसंस्था चा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

यावेळी बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, माझ्या प्रभागातील नागरिकांची गैरसोय दूर करणे ही माझी जबाबदारी असून गैरसोय दूर केल्याचे समाधान मला आहे. लस सुरक्षित आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून येऊन लसीकरण करावे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

या उदघाटन प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर , गणेश कळमकर, डॉ. सागर बालवडकर, प्रा. रुपाली बालवडकर, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे, औंध- बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किमया कुलकर्णी, परिचारिका श्वेता देशपांडे, डाटा ऑपरेटर नीलेश बराटे, नितीन कळमकर, समीर चांदेरे, अर्जुन ननावरे, अर्जुन शिंदे, विशाल विधाते, राखी श्रीरावदे, सुषमा ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे, मनोज बालवडकर, प्रणव कळमकर, संजय ताम्हाणे, प्राची सिद्दीकी इत्यादी मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होता.