बालेवाडीत राष्ट्रवादीकडून घरेलू कामगारांच्या कोरोना चाचणी.

0
slider_4552

बालेवाडी :

राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ व प्राची डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने घरेलु महिला कामगार यांसाठी माफक दरात करोना चाचणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये घरेलु कामगार महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन चाचण्या करून घेतल्या. बालेवाडी मध्ये कम्फर्ट झोन येथे  डॉ. सागर बालवडकर व प्रा. रुपाली बालवडकर संस्थापक अध्यक्ष बालेवाडी महिला संघ यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

करोना चे संकट सर्वांवर आलेले असताना अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांना स्वतःसाठी करोना ची टेस्ट करून घेणे परवडणारे नाही. त्यामुळे आलेला आजार अंगावरती काढत आहेत. त्यांचा स्वतः बरोबर कुटुंबास देखील धोका निर्माण होत आहे. म्हणूनच बालेवाडी येथे डॉ. सागर बालवडकर यांनी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या गोरगरीब महिलांसाठी सवलतीच्या दरात करोना टेस्ट करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या महिलेस औषधे मोफत देण्यात येणार आहेत.

यामुळे महिलांना लवकर टेस्ट रिपोर्ट मिळणार असुन, आवश्यक असल्यास तत्काळ उपचार घेता येतील. सदर महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्यास डॉ. सागर बालवडकर व प्रा. रूपाली बालवडकर यांच्यावतीने मोफत औषधांचे किट देण्यात येणार आहे. करोना विरुद्ध लढा देताना सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य लाभावे, परवडणाऱ्या दरात त्वरित करोनाची टेस्ट करून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ऐक महत्वाचे काम डॉ. सागर बालवडकर यांनी केले आहे. या प्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी डॉ. सागर बालवडकर यांनी राबविलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली.

या वेळी प्राची सिद्दीकी, मित विज, विशाल विधाते, विकास कामत आदि मान्यवर उपस्थित होते.

 

See also  शिवसेना व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेले रक्तदान शिबीर उत्साहात पार.