भारतीय वायु सेनेत आणखी राफेलची १० विमाने दाखल होणार.

0

नवी दिल्ली:

पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या भारतविरोधी हालचालींना लगाम घालण्यासाठी हवाई दलाने आपली क्षमता आणखी वाढविलीआहे. राफेल या लढाऊ विमानांची पहिली खेप भारतात दाखल झाल्यानंतर आता दूसऱ्या फेरीत आणखी 10 राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत.

एप्रिल महिन्यात ही विमानं भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे राफेल लढाऊ विमानांची एकूण संख्या 21 वर पोहोचणार आहे. यापूर्वी भारतात 11 राफेल लढाऊ विमानं आली असून अंबाला स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झाली आहेत.

जुलै-ऑगस्ट महिन्यापासूनच भारतीय वायुसेनेनं राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. लडाखसह चीन सीमेवर पेट्रोलिंगसाठी राफेल विमानं तैनात करण्यात आली आहेत. आता येणाऱ्या विमानांपैकी काही बंगालच्या हाशिमारा बेसवर तैनात केली जाणार आहे. हाशिमारा एअर फोर्स स्टेशन भूटानजवळ असून तिबेटपासून 384 किलोमीटर दूर आहे.

मल्टिरोल लढाऊ राफेल विमानात प्रत्येक मोहीमेत काम करण्याची क्षमता आहे. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीवर झेप घेऊ शकते. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे. स्काल्पची रेंज 300 किलोमीटरपर्यंत आहे. राफेलचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

भारताने फ्रान्ससोबत सप्टेंबर 2016 साली एकूण 36 राफेल लढाऊ विमानांचा करार केला होता. आता 10 राफेल विमानांची खेप येणार असल्याने ही संख्या 21 वर पोहोचणार आहे. आणखी 15 राफेल विमानं अंबालामधून संपूर्ण पाकिस्तान तसेच चीनचा काही भाग सहज राफेलच्या टप्प्यात येतो. लडाखमध्ये चीन करत असलेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नांवर अंकुश ठेवणेही राफेलमुळे शक्य आहे. तसेच पश्चिम बंगालमधील हाशिमारा हवाई तळावरुन चीनच्या भारतालगतच्या सर्व प्रांतांवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत मिळत आहे.

चीनने नेपाळ, म्यानमार, भूतान यापैकी एखाद्या देशामध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मदत मागितली तर तातडीने राफेल विमान पाठवणे हाशिमारा हवाई तळामुळे सोपे झाले आहे. हाशिमारा हवाई तळ भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या ट्रायजंक्शन परिसरात आहे.

See also  राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घरांची किंमत ठरली....