पर्यावरण प्रेमी नागरिकांचा कोथरूडमधील उद्यानात  ई झाडे बसवण्यास विरोध…

0

पुणे :

कोथरूड मधील बाळासाहेब ठाकरे उद्यानात बसवण्यात येणाऱ्या 88 लाखाच्या तिन झाडांना पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे.  यासंदर्भात आयुक्तांना ई झाडे बसवण्यात येऊ नयेत असे निवेदन एरीया सभा असोसिएशन ऑफ पुणे च्या वतीने ऑनलाइन पाठवण्यात आले आहे.

कोथरूड येथील उद्यानात झाडांची माहिती सांगणारे  आर्टिफिशियल तीन झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांसाठी पालिकेला तब्बल 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. मुळात ही आर्टिफिशल झाडे लावून त्याचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून काहीच फायदा नाही. नागरिक भरत असलेल्या टॅक्स मधून अशी उधळपट्टी करणारे विकास कामे  नकोत अशीही सूचना पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत माहिती सांगताना एरिया सभा असोसिएशन ऑफ पुण्याच्या सदस्य व  औंध विकास मंडळचे वैशाली पाटकर यांनी सांगितले की, ही दिखाऊ झाडे लावून काहीही फायदा होणार नसून, नुसतेच पालिकेचे पैसे खर्च होणार आहेत. लोकांचे गर्दी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वटिका  तयार केले पाहिजे. नक्षत्रवन, देवराई, पंचवटी, राशी वन अशा प्रकारची वनराई तयार करून  नागरिकांना  वेगवेगळ्या वृक्षांची माहिती यातून मिळेल.

तसेच आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची नियमाप्रमाणे कारवाई होती का नाही याची माहिती देण्यात यावी. विनापरवाना झाडे तोडणार्‍या वर गुन्हे दाखल करण्यात यावे. झाडं बाबत असलेल्या कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

See also  चांदणी चौक उड्डाणपूल कामाला लवकरच गती मिळणार : महापौर