चांदणी चौक उड्डाणपूल कामाला लवकरच गती मिळणार : महापौर

0

पुणे :

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पासाठी ९९.५% जमीन संपादित करण्यात आली असून या जमिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जानेवारी २०२१ मध्ये बांधकामासाठी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कामाला आता गती मिळाली असून या कामाचा आढावा केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी आज शनिवार दि. १३ रोजी घेणार आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाची पाहणी करावी, अशी विनंती महापौर मोहोळ यांनी गडकरी यांना पत्राद्वारे केली होती.शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असणारा हा प्रकल्प जवळपास ९०० कोटींचा असून यात महापालिकेने ४६५.२२ कोटी रुपये महापालिका खर्च करत आहेत. महापालिकेच्या वाट्यातील रकमेत १८५.४३ कोटी रुपये राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. महापौर मोहोळ म्हणाले की,’ राष्ट्रीय राजमार्ग क्र. ४ वरील चांदणी चौकातील रस्त्याचे एकात्मिक विकसनाबाबत एन.सी.सी या एजन्सीची नियुक्ती दि. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली होती.

सदर कामाला आता गती मिळाली आहे.’ ‘भुसंपादनाखाली पुणे महानगरपालिकेने एकूण १८.९७३ हेक्टर जमीन ताब्यात घ्यायची होती. त्यामधील एकूण १३८ मिळकतीपैंकी सध्यस्थितीत १३१ जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. सदर जागेचे संपादन करण्यासाठी १८५.४३ रुपये कोटी इतका निधी राज्य शासनाच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, असे महापौर मोहोळ यांनी माहिती दिली. महापौर मोहोळ म्हणाले की, ‘भूसंपादनातील अडचणी आणि गेल्या वर्षभरात पुणे शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव या अनुषंगाने काम थोडा विलंब झाला. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाहणीनंतर कामाला वेग येऊन, काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत होणार आहे.’

See also  स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वारद फाउंडेशनच्यावतीने ऑनलाइन नृत्य स्पर्धा संपन्न