माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यात दाखल

0

पुणे :

पुणे मेट्रो प्रकल्प- 3 (माण-हिंजवडी – शिवाजीनगर) मधील पहिली मेट्रो पुण्यात दाखल झाली आहे. अलस्टॉम या कंपनीने आंध्रप्रदेश येथील श्रीसिटी येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनवटीची आहे. ही मेट्रो रविवारी (दि. 2) या मार्गिकेच्या माण येथील आगारात दाखल झाली.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे.

टाटा समूहाच्या वतीने ‘अलस्टॉम’ कंपनीला या प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण 22 ट्रेनचे कंत्राट दिले आहे. ताशी 85 किलोमीटर इतक्या कमाल वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात 21 नोव्हेंबर पर्यंत जमावबंदी