जगात पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत, त्यातून रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे, ते केवळ मोदींमुळेच : देवेंद्र फडणवीस

0

बाणेर :

एक मजबूत भारत मोदीजींच्या मुळे झाला आहे. बॉम्बस्फोट आधी व्हायचे केवळ अमेरिकेत जावून पुरावे द्यायचे. मोदी पंतप्रधान झाल्यावर बॉम्बस्फोट झाले. आपण सर्जिकल स्टाईक केला. जगात पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो. त्यातून संधी, रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे. लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार आहे. जो मतदान करतो त्याला नैतिक अधिकार आहे. मतदान ही देशसेवा आहे. तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. कमळाचे बटन दाबा, मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल. तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील मोदीजी मजबूत भारत बनवतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, मकरंद देशपांडे, दत्ता गायकवाड, गणेश बिडकर, बाबुराव चांदेरे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, परशुराम वाडेकर, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, मयुरी कोकाटे, लहु बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ॲमेनिटी स्पेसवर विविध सुविधा झाल्या. अतिशय वेगाने मेट्रोची वाढ होते आहे. चांदणी चौकाचे काम पूर्ण होऊ शकले. पायाभूत सुविधांसाठी निधी दिलेला आहे. पाणीपुरवठ्याची अपुरी सोय आहे. रोज टँकरने पाणी मागवावे लागते. सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प गंभीर आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना मतदानाच्या रुपाने आशिर्वाद मिळेल असा विश्वास वाटतो.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गिरीश बापट यांना 3 लाख 23 हजार मतांचे मताधिक्य होते. ते वाढविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी देशाच्या निवडणुकीत मतदान घडवावे लागेल. मोदीजींनी समाजाच्या विविध घटकांसाठी काम केले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. पुढची पाच वर्षे जनसामान्यांच्या आशा आकांक्षा, सुरक्षा, विकास यांची विचार करण्याची निवडणूक आहे. एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या समवेत वेगवेगळे 18 पक्षांची महायुती आहे. राहुल गांधी यांच्या समवेत 24 पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. 24 नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. 140 कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. सबका साथ सबका विकास मोदीजी करीत आहेत.

यावेळी बाणेर बालेवाडी परिसरातील भाजपाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  आंबिल ओढ्याचा प्रवाह संदर्भात संयुक्त समिती नेमण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश.