सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या शुक्रवारी.

0

पुणे :

पुण्यासह राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची सोडत आता लवकरच करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या शुक्रवारी २९ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची सोडत ही त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पॅनेलने बहुमत मिळविले आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने आपले कार्यकर्ते निवडून आले असून बहुमताचा दावा केला आहे.

सरपंच निवडणुकीनंतर कोणाचे बहुमत हे स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सरपंच आरक्षण कसे पडते, यावरही अनेक ग्रामपंचायत कोणाच्या बाजूला जाणार हे ठरणार आहे. त्यामुळे या आरक्षणालाही महत्व आले आहे.

See also  पुणे जिल्ह्यात पर्यटनस्थळे विकासाकरीता सुमारे ६४४ काेटी रुपयांचा सर्वंकष आराखडा तयार