पुणे शहराला मिळणारे पाणी कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये : महापौर

0

पुणे :

पुणे शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला शहरातील लोकप्रतिनिधी, जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहराचा आताचा पाणी कोटा आणि आगामी काळातील गरज यावर बैठकीत चर्चा झाली. जलसंपदा विभागाने भामा-आसखेडचे पाणी सुरू झाल्यानंतर भामा-आसखेडमधून मिळणारे 2.6 टीएमसी पाणी हे खडकवासला धरणातून शहराला मिळणाऱ्या पाण्यातून हे कमी करावे, अशी भूमिका जलसंपदा विभागाची आहे. जलसंपदा विभागाची ही भूमिका चुकीची आहे, असा मुरलीधर मोहोळ यांनी मुद्दा बैठकीत मांडला. .

पुणे शहराच्या महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश झालेला आहे आणि एकूण लोकसंख्या जवळपास ६३ लाखांपर्यंत जाणार आहे.त्यामुळे पुणे शहराला मिळणारे पाणी कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये, अशी मागणी ठामपणे बैठकीत केली. अशाप्रकारे पाणी कमी करण्याचा कुठलाही निर्णय पुणेकरांच्या हिताचा नाही. त्यामुळे तो निर्णय घेऊ नये अशी आग्रही भूमिका देखील त्यांनी मांडली.

See also  पुण्यात परत एल्गार परिषद आयोजन?