मुंबई :
डिजिटल पेमेंट क्षेत्रात आणखी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व बँकेने टाटा समूहाच्या डिजिटल पेमेंट ॲप टाटा पेमेंट्सला पेमेंट एग्रीगेटर परवाना मंजूर केला आहे.
यामुळे टाटा कंपनीला टाटा पे या पेमेंट ॲपच्या माध्यमातून ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करण्यास मदत होणार आहे. टाटा डिजिटल या उपकंपनीद्वारे टाटा पेमेंट हे चालवले जाणार आहे.
टाटा पे बहुप्रतिक्षित पेमेंट परवाना सुरक्षित करण्यासाठी रेझरपे, कॅशफ्री, गुगल पे आणि इतर कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहे. पेमेंट ॲग्रीगेटर लायसन्स मुळे आता टाटा त्यांच्या उप कंपन्यांमधील सर्व ई-कॉमर्स व्यवहारांना सक्षम बनवू शकणार आहे.
ज्यामुळे निधीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यास मदत होणार आहे. टाटा ने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पदार्पण केल्याने या क्षेत्रात आणखी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
भारतातील प्रमुख डिजिटल पेमेंट कंपन्या
गुगल पे हे गुगलने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे. हे ॲप भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पेमेंट ॲप्स पैकी एक आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी गुगल पे चा वापर केला जाऊ शकतो. फोन पे हे फ्लिपकार्ट द्वारे विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे. हे ॲप भारतातील दुसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट ॲप आहे.
याचा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो. पेटीएम हे पेटीएम ने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे. हे ॲप भारतातील तिसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी पेटीएमचा वापर केला जाऊ शकतो.