भारतीय महिला बॉक्सर नी आणखी दोन सुवर्णपदके जिंकली, लवलीना बोरगोहेन व निखत झरीन चॅम्पियन..

0

नवी दिल्ली :

नवी दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रविवारी (26 मार्च) भारतीय महिलांनी आणखी दोन सुवर्णपदके जिंकली. रविवारी ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीना बोरगोहेन व निखत झरीन यांनी सुवर्णपदके आपल्या नावे करत भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या चार केली.

सलग दुसऱ्यांदा जगज्जेती होण्याचा मान मिळवण्यासाठी निखत मैदानात उतरली होती. आपल्या शानदार फॉर्मची तिने पुन्हा एकदा झलक दाखवली. अंतिम फेरीत तिच्यासमोर व्हिएतनामच्या टी टॅम हिचे आव्हान होते. टॅम ही दोन वेळा आशियाई विजेती राहिली आहे. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत निखतने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले. मेरी कोमनंतर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारी ती केवळ दुसरी भारतीय बॉक्सर ठरली.

त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या लवलीना बोरगोहेन हिने 75 किलो वजनी गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा सामना केला. तिने 5-2 असा विजय मिळवत भारताच्या खात्यात चौथे सुवर्णपदक टाकले.

शनिवारी भारतीय संघाला दोन सुवर्णपदके मिळाली होती. स्वीटी बुरा अणि नीतू घंघास यांनी सुवर्णपदके जिंकत आपापल्या वजनी गटात विश्वविजेते होण्याचा मान मिळवलेला.

See also  मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने 227 धावांनी मिळविला मोठा विजय, बांगलादेशने मालिका 2-1 अशी जिंकली..