स्त्री पुरूष समान कायदा करा, पुण्यात पुरुषांचे आंदोलन..

0

पुणे :

पुणे शहरात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन पाहायला मिळाले. स्त्री पुरूष समान कायदा करा, अशी आंदोलक पुरूषांची मागणी आहे. स्त्रियांसारखा समान कायदा आम्हालाही द्या या मागणीसाठी पुण्यात पुरुष मंडळी आंदोलनाला बसले आहे.

स्त्री पुरूष समान कायदा करा, अशी आंदोलक पुरूषांची मागणी आहे. स्त्रियांसारखा समान कायदा आम्हालाही द्या या मागणीसाठी पुण्यात पुरुष मंडळी आंदोलनाला बसले आहे. अनेक कायदे हे फक्त महिलांच्या बाजूने पुरुषांचा देखील विचार व्हावा आंदोलन करणाऱ्या पुरुषांची मागणी असून यासंबंधित आंदोलक पुरुष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार विरोधात पुरुषांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वा Elon Musk यांची पूजा आणि आरती देखील करण्यात आल्याचे या आंदोलनस्थळी पाहायला मिळाले आहे.

सासरच्या त्रासाला कंटाळून आतापर्यंत अनेक पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळेच कुटुंबियांपासून त्रस्त असलेले पुरुष एकत्र आले आहेत आणि त्यांनी आता पुण्यात अनोखं आंदोलन पुकारलं आहे. ‘सेव्ह इंडीयन फॅमिली फाऊंडेशन’कडून दोन दिवस आंदोलन करण्यात येणार आहे.

See also  यावर्षी देखील पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार.