पाषाण गावातील कॉसमॉस बँक शाखेच्या वतीने बावधन येथिल मतिमंद मुलांच्या संस्था चालवणाऱ्या महिलेचा सन्मान..

0

बावधन :

पाषाण गावातील कॉसमॉस बँक शाखेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून बावधन येथील अनिकेत सेवाभावी संस्था संचालित ओम साई ओम मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प हि संस्था चालविणाऱ्या कल्पना वर्पे यांचा सन्मान करत संस्थेच्या मुलांसाठी अन्न धान्य साहित्य देण्यात आले.

कॉसमॉस बँक हि या भागात नामांकित बँक असुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. एक महिला सक्षम पणे मतिमंद मुलामुलींची संस्था चालवते हि अभिमानाची बाब आहे म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी कॉसमॉस बँक पाषाण गाव शाखेच्या रुपाली वेल्हणकर, असिस्टंट मॅनेजर रंजना सोनावणे, असिस्टंट मॅनेजर स्मिता एडके आणि  कपिल जाधव उपस्थीत होते.

 

See also  बावधन मध्ये सुर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर...