पुण्यात जलशुद्धीकरण केंद्र वाढवण्याची आवश्यकता

0

 

छावा स्वराज्य सेनेच्या वतीने देण्यात आले महापालिका आयुक्तांना निवेदन….

पुणे: शहर प्रतिनिधी:-

छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त  विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले, ते असे की पुणे महानगरपालिका अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प राबविला जातो, ही योजना पुण्याची लोकसंख्या पहाता खुपच कमी प्रमाणात राबविला जातो. त्यामुळे बऱ्याच मोठ्या सोसायटी किंवा कंपन्यांचे घाण पाणी ये शुद्धीकरण न करता पुण्यातील बऱ्याच नद्यांमध्ये सोडले जात आहे.

पाणी दुषित तर होतेच परंतु या पाण्यामुळे पशु,पक्षी यावर परिणाम होत आहे. तसेच बऱ्याच शेतींची देखील नासाडी होत आहे. दूषित पाण्यामुळे पिकवलेल्या शेतीतील फळभाज्या तसेच भाजीपाल्यामुळे कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारास सामोरे जावे लागत आहे. यावर आळा घालायचा असेल तर जलशुद्धीकरण करणारे प्रकल्प लोकसंख्या विचारात घेऊन वाढविणे गरजेचे आहे जेणेकरून हे असले दुषित पाणी मानवास किंवा पशु – पक्षीना हानी पोचविणार नाही.

पुणे महानगरपालिका वतीने जायका प्रकल्प उभारला जात आहे. पण हा गेली ४ ते ५ वर्ष झालं नुसते नावसाठीच काम चालू आहे, अजून काही तो पूर्ण झाला नाहीये.  पुढील ३ ते ४ वर्ष अजून लागतील तोपर्यंत लोकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. महापालिका काय करणार हे उत्तर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.

छावा्वराज्य सेना, प्रदेश कार्याध्यक्ष  आरिफ शेख यांनी कुमार यांना हे दूषित पाणी रोखण्यासाठी काही उपाय सुचविले.  सदर निवेदन देताना  छावा स्वराज्य सेना,संस्थापक/अध्यक्ष  राम घायतिडक(पाटील),प्रदेश कार्यध्यक्ष  आरीफ शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष  स्वप्निल पडवळ,महिला उपाध्यक्षा पुणे जिल्हा तसेच कायदे सल्लागार सुषमा यादव व उमेश चांदणे उपस्थित होते.

See also  पुणे मेट्रोचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच सुरू होणार !