शेतकऱ्यांची थकीत बिल लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेने दिले निवेदन.

0

पुणे :

साखर संकुल महाराष्ट्र राज्य आयुक्त शेखर गायकवाड, यांची भेट घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील शीला अतुल शुगर टेक प्रायव्हेट लिमिटेड. नाशिक संचालित “जय लक्ष्मी शुगर प्रॉडक्ट ” तालुका नितळी येथील कारखान्या संदर्भात सदर 26 शेतकऱ्यांचे पेमेंट जवळजवळ 900 टनउसाचे बिल थकित केलेले आहे. हे थकीत बिल लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावे म्हणून स्वाभिमानी पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी निवेदन दिले.

सदरचे पैसे मिळावेत म्हणून साखर आयुक्त यांच्याबरोबर मीटिंग झाली. सदरील कारखान्यावर जप्तीची ऑर्डर करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आवाज उठवण्यात आला. तसेच ह्या अगोदरही सहसंचालक साखर आयुक्त सोलापूर विभागा मध्ये अनेक वेळा ऊस बिलासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती. ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आज पुण्यामध्ये साखर आयुक्तांनची भेट घेवुन निवेदन देण्यात आले अशी माहिती प्रकाश बालवडकर यांनी दिली.

त्यासंदर्भात साखर आयुक्त यांनी सदरील कारखाण्यावर जप्ती काढण्याचे आदेश देण्याचे मान्य केले व सदरील शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत आश्वासन दिले. याप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष प्रकाश बालवडकर, हनुमंत बालवडकर, सुरेश भोसले, प्रशांत भोसले ,संदीप बालवडकर, धनराज यादव, समाधान भिडे, आदी शेतकरी यावेळेस उपस्थित होते.

या कारखान्यात बरोबरच महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची असलेली थकित रक्कम त्वरीत मिळाली नाही तर साखर संकुल येथे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रकाश बालवडकर यांनी मॅकन्यूज शी बोलताना दिली.

 

See also  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, 63 आगारातील वाहतूक ठप्प होती