सुसगाव :
२००१ पासुन न्यू सम्राट स्पोर्ट्स क्लब ची सुसगाव मध्ये सुरुवात झाली तेंव्हा पासुन २०२२ पर्यंत अविरत पणे कबड्डी चा प्रवास सुरू आहे. अनेक चढ उतार अनुभवत आज देखिल मोठया दिमाखात आपला वर्धापन दिन जुन्या नव्या सर्व खेळाडूंना सोबत घेऊन विद्यमान खेळाडूंनी साजरा केला.
यावेळी संघाचे मार्गदर्शक नंदकुमार फणसे, विकास भालेकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संघाची वाटचाल खंबीरपणे अशीच पुढे सुरू ठेवावी अशा अपेक्षा नवोदित खेळाडूंकडून यावेळी व्यक्त केल्या.
संघाचे खेळाडू आणि आधारस्तंभ ग्रा. सदस्य अमोल चांदेरे यांनी यावेळी संघासाठी वाटेल ती मदत करू प्रत्येक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. नवोदित खेळाडूंनी खेळाकडे लक्ष द्यावे. व्यायाम करून संघाची व स्वतःची प्रगती करावी अशा अपेक्षा वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केल्या.
यावेळी खेळाडूंनी मैदान सजावट केली होती. मैदानावर सगळीकडे दीप प्रज्वलित करण्यात आले होते. यावेळी केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.