कु. सावरी शिंदे चे पालकत्व बाणेर करांनी स्वीकारले..

0

बाणेर :

बाणेर गावची सुकन्या कु.सावरी सुर्यकांत शिंदे यांनी दुबई येथे पार पडलेल्या एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पीयनशिप – २०२२ मध्ये कांस्यपदक पटकावल्याबद्दल संपूर्ण बाणेरकर व माधव बाग सोसायटी रहिवासी्यांकडून सत्कार समारंभ आयोजित केला होता.

कु.सावरी सुर्यकांत शिंदे माधवबाग सोसायटी बाणेर येथे रहायला असून,सावरी शिंदे या दहा महिन्यांची असतांना तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सावरी हिच्या आईने मोहिनीताई यांनी राजमाता जिजाऊ यांचा वसा वारसा हाती घेऊन सावरीला लहानची मोठी केली व संस्कारासोबतच खेळात हि अव्वल राहील याची नेहमीच काळजी घेतली.आईच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून सावरी हिने एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पीयनशिप – २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे नाव उंचाविले. हि बाणेर गावासाठी

यावेळी माधवबाग सोसायटी येथे आज कु.सावरी सुर्यकांत शिंदे यांचा भव्य सत्कार व मिरवणूक काढण्यात आली.यावेळी माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने कु.सावरी सुर्यकांत शिंदे यांचा एक लाख रुपयांचा चेक देऊन सन्मान केला.

यावेळी बोलतांना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, कु.सावरी सुर्यकांत शिंदे यांना सरकारी सेवेत घेण्यात यावे यासाठी माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर व माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या वतीने पुण्याचे पालक मंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.

चांगल्या कामासाठी व एखाद्या चांगल्या खेळाडूला साथ देण्यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेऊन एकत्र येऊन बाणेरकर मदत करतात असा बाणेर चा इतिहास आहे असेही गणेश कळमकर यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, अशोक मुरकुटे, पांडुरंग तात्या कळमकर, अर्जुन शिंदे जीवन चाकणकर,नितीन कळमकर, राहुलदादा बालवडकर,नितीन कळमकर सर, अमर लोंढे यादी मान्यवर व सोसायटी नागरिक उपस्थित होते.

See also  बाणेरच्या सावरी शिंदे हिने दुबई येथे एशियन गेम पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये कंस्यपदक पटकावल्याने माधवबाग सोसायटीच्या वतीने सन्मान.