भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची नेमणुक.

0

भंडारा :

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशी करण्यासाठी राज्य शासनानं आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सांगितले.

बेफिकिरी दाखवणाऱ्या तसंच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याच्या कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल, असं टोपे यांनी सांगितलं. या आपत्तीत तातडीनं मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचं बाळ या घटनेत दगावलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

See also  लॉकडाऊन शेवटचा पर्याय ! मुख्यमंत्री