इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक..

0

मेलबर्न :

मागील जवळपास महिनाभरापासून ऑस्ट्रेलिया खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाला अखेर नवा विजेता मिळाला. रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले.

सॅम करन व बेन स्टोक्स हे इंग्लंडच्या विजयाचे नायक ठरले.

आपले दुसरे टी20 विश्वचषक विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात दोन्ही संघांनी पाऊल ठेवले. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला.‌ जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान या यशस्वी जोडीला त्यांनी जखडून ठेवले. पहिल्या गड्यासाठी त्यांनी 29 धावांची भागीदारी केली. रिझवान या सामन्यात केवळ 15 धावांचे योगदान देऊ शकला. युवा मोहम्मद हारीस या सामन्यात अपयशी ठरला. बाबरने 28 चेंडूवर 32 धावांची संथ खेळी केली. शान मसूदने 38 तर शादाब खानने 20 धावांचे योगदान दिले.

तळातील फलंदाज पाकिस्तानसाठी फारसे योगदान देऊ शकले नाहीत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना फटकेबाजी करू दिली नाही.‌ पाकिस्तानसाठी सॅम करनने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर, जॉर्डन व राशिद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात जबर धक्का बसला. मागील सामन्यात नाबाद अर्धशतक पूर्ण करणारा ऍलेक्स हेल्स शाहिन आफ्रिदीचा शिकार ठरला. चाचपडत खेळणारा फिल सॉल्ट केवळ दहा धावा करत बाद झाला. कर्णधार जोस बटलरने झटपट 26 धावा ठोकल्या. बटलर बाद झालं तेव्हा इंग्लंड संघ संकटात सापडला होता. मात्र, अनुभवी बेन स्टोक्सने हॅरी ब्रुकसह 39 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. अडखळत खेळत असलेल्या स्टोक्सने खराब चेंडू मिळतात नवाझ याच्यावर हल्ला चढवत इंग्लंडच्या विजयाचे दरवाजे खुले केले. मोईन अलीनेही वसीमला तीन चौकार ठोकत पाकिस्तानला सामन्यातून बाहेर नेले. मोईनने 13 चेंडूवर 19 धावांचे योगदान दिले. स्टोक्सनेच आपले अर्धशतक पूर्ण करून संघासाठी विजयी धाव काढली.

See also  भारताने हॉकी प्रो- लीगच्या युरोप दौऱ्यात ऑलिंपिक चॅंपियन्स बेल्जियमला शूट-आऊटमध्ये ५-४ असे हरवले.