दुसरा टी २० सामना जिंकून भारताची मालिकेत बरोबरी

0

नागपूर :

टी 20 सामना नागपूर येथे खेळला गेला. खराब मैदानामुळे तब्बल अडीच तास उशिराने सामना सुरू झाला. प्रत्येकी आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 91 धावांचे आव्हान चार चेंडू राखून पार केले.

अखेरच्या षटकात विजयासाठी नऊ धावांचे आव्हान असताना दिनेश कार्तिकने मैदानात येतात एक षटकार आणि एक चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, एका बाजूने अखेरपर्यंत नाबाद राहत रोहित शर्माने विजयाचा खरा पाया रचला. यादरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावे नोंद केले.

ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ऍरॉन फिंचच्या 31 व मॅथ्यू वेडच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा व केएल राहुल यांनी आक्रमक सुरुवात दिली. मात्र, एकापाठोपाठ सलग चार फलंदाज नियमित अंतराने बाद झाल्याने भारतीय संघ काहीच अडचणी सापडला होता. कर्णधार रोहित शर्मा एका बाजूने उभा होता. त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवत 20 चेंडूवर 4 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 46 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

See also  रोमहर्षक सामन्यात  पाकिस्तानने भारताला केले पराभुत..