महाराष्ट्रात जॉन्सन अँड जॉन्सन्स बेबी पावडरचा उत्पादन परवाना रद्द

0

मुंबई :

भारतातील प्रसिद्ध असणारे जॉन्सन अँड जॉन्सनचे बेबी टॅल्कम पावडरची उत्पादक कंपनी असलेली जॉन्सन्स अँड जॉन्सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मुलुंड, मुंबई चा महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने उत्पादन परवाना रद्द केला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी टॅल्कम पावडरमुळे कँसर होतो असा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर मे 2020 मध्ये जगभरात हजारो खटले कंपनीवर दाखल करण्यात आले होते. कंपनीची पावडर वर्षभरापूर्वीच अमेरिका आणि कॅनडामध्ये बंद करण्यात आली आहे.

जॉन्सन्स अँड जॉन्सन्सची बेबी टॅल्कम पावडरची भारतात उत्पादक कंपनी मुलुंड येथे आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने गुणवत्ता तपासणीच्या उद्देशाने पुणे आणि नाशिक येथे जॉन्सन बेबी पावडरचे नमुने काढले. काढलेले नमुने शासनाने मानक दर्जाचे नसल्याचे निदर्शनास आले. जॉन्सन्स बेबी पावडरचे नमुने pH मध्ये मानक नाही असे घोषित केले आणि उत्पादनाच्या वापरामुळे नवजात बालकांच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे FDA ने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी जॉन्सन अँड जॉन्सन्स बेबी पावडरचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे.

 

See also  पर्यावरणाचे नियम न पाळल्याबद्दल शिंदे सरकारला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ठोठावला मोठा दंड