ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांना पराभवाचा धक्का लिज ट्रस विजयी.

0

ब्रिटन :

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना पराभवाचा धक्का लागला आहे. युकेच्या परराष्ट्र मंत्री लिज ट्रस यांचा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे त्या आता बोरिस जॉनसन यांची जागा घेतील.

लिज ट्रस यांना कंन्जर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आलं आहे.

बोरिस जॉनसन यांचा उत्तराधिकारी म्हणून पक्षाच्या सदस्यांना ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यापैकी एकाची निवड करायची होती. 42 वर्षांच्या सुनक यांना पंतप्रधानदाच्या शर्यतीत 47 वर्षांच्या लिस ट्रस यांनी पराभूत केलं आहे. लिज ट्रस ब्रिटनच्या तीसऱ्या महिला पंतप्रधान असणार आहेत. त्यांच्या आधी थेरेसा मे, मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडचे पंतप्रधान पद भूषवले आहे.

कोणाला किती मतं?

लिज ट्रस : 81,326
ऋषी सुनक : 60,399
एकूण मतं: 172,437
एकूण मतदान : 82.6%
रद्द झालेलं मतं : 654

See also  महाराष्ट्रात रखडलेला बैलगाड्यांच्या शर्यतीचा निर्णय कर्नाटकात निकाली, उच्च न्यायालयाने दिली परवानगी