पिंपरी चिंचवड सराईत गुन्हेगाराकडुन पिस्टल जप्त : सांगवी पोलीस ठाणेची कारवाई.

0

सांगवी :

बुधवार दिनांक ०६ रोजी पोलीस उप निरीक्षक विनोद शेंडकर, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस शिपाई अनिल देवकर, पोलीस शिपाई दिपक पिसे असे सांगवी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना रात्री ८ :२० वा. चे सुमारास भिसे व पिसे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, पिंपळे सौदागर स्मशानभुमी जवळ, हॉटेल गरीब नवाज शेजारी, पिंपळे सौदागर येथे पांढऱ्या रंगाचा फुल बाहयांचा फुलांफुलांचा डिझाईन असलेले शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेला एक इसम पिस्टल घेवुन येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच बातमी पोलीस उप निरीक्षक शेंडकर यांना कळविली.

घटनास्थळी पोहोचले असता वर्णनाचा एक संशयित इसम दिसल्याने त्यांस पकडुन पोलिसांनी त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शुभम महादेव खडसे, (वय २२ वर्षे, रा. के/ऑफ नखाते, गुलमोहोर कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्याकडे सदर पिस्टल व काडतुसांबाबत विचारपुस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देवुन त्याबाबत नीटपणे समाधानकारक खुलासा केला नाही. त्याच्या ताब्यातील पिस्टल व दोन जिवंत काडतुस घेवुन पोलीस उप निरीक्षक विनोद शेंडकर यांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपी शुभम महादेव खडसे याचे विरुध्द पोलीस शिपाई पिसे यांनी तक्रार दिल्याने सांगवी पोलीस ठाणे कलम ३(२५) सह महा. पो.अघि. कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक कारवाई करीत आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे हे करीत आहेत.

गुन्हयातील अटक आरोपी याच्याविरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.

१) सांगवी पोलीस ठाणे गु.र.नं. ३६१/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे

२) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ४१९/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे

सदरची कामगिरी कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त, पिं.चिं., आनंद भोईटे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ २, गणेश बिरादार सहा. पोलीस आयुक्त, अजय भोसले पोलीस निरीक्षक (गुन्हे) सांगवी पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विनोद शेंडकर, पो.हवा. चंद्रकांत भिसे, सुरेश भोजने, कैलास केंगले, रोहिदास बोहाडे, प्रविण पाटील, अरुण नरळे, नितीन खोपकर, दिपक पिसे, अनिल देवकर, विजय मोरे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर यांनी केली आहे.

See also  पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशात चौथे स्थान पटकावले आहे. तर पुणे स्मार्ट सिटीचा पाचवा क्रमांक आला आहे.