पुणे बार असोसिएशन तर्फे ‘ज्युडीशियल कोलोकिया’ पुष्प ३ चे  आयोजन…

0

पुणे :

पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे वकीलांसाठी जिल्हा न्यायलय येथे  ‘ज्युडीशियल कोलोकिया’  या कार्यक्रमाचे ३ रे पुष्प  अशोका हॉल येथे शनिवार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी दुपारी  २.०० वा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय. श्रीराम मोडक साहेब यांच्या ‘न्यायनिर्णय एक प्रक्रिया’ या विषयावरील व्याख्यानाने पार पडले.

या प्रसंगी पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष मा पांडुरंगजी थोरवे हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती माननीय. श्रीराम मोडक साहेब म्हणाले की, न्यायनिर्णय हे एक प्रकारचे नवनीत आहे. लोणी तयार करण्याच्या प्रक्रियेसारखे न्यायदानाची प्रक्रिया असते. न्यायाधीश हा सुद्धा एक माणूसच आहे त्याच्या आयुष्यात सुद्धा अनेक अडचणी असतात त्या सर्व गोष्टी मागे ठेवून त्याला सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून न्यायदान करावं लागते. तसेच असारातून सार बाजूला काढण्याचे काम वकील वर्गाचे असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यक्षम पणे वकिली पेशा चालवला पाहिजे. तसेच वकील संघटना, न्यायालये व न्यायव्यवस्था यांची प्रतिमा मलिन होऊ न देणे व त्याची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच पुणे जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख म्हणाले की, न्यायप्रणाली ही विवेकशील असते व आपल्या कार्याच्या माध्यमातून विवेकाचा प्रसार करण्याचे काम करते.

सदर ‘ज्युडीशियल कोलोकिया’ च्या ३ ऱ्या पुष्पासाठी मा. न्यायमूर्ती मोडक साहेब यांचे मार्गदर्शन लाभणे हे अमाच्यासाठी आनंददायी आहे. न्यायमूर्ती मोडक साहेबांचा यांनी यापूर्वी पुणे जिल्हाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे व त्या काळात बार आणि बेंच यांच्यामधील नाते अधिक घट्ट करण्यात साहेबांचा महत्वाचा वाटा आहे. साहेबांनी स्वतःहुन अनेकांच्या अडचणी सोडवल्या व प्रभावीपणे प्रशासन चालवले व जिल्हा न्यायाधीश कसे असावेत याचा आदर्श घालून दिला असे पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंगजी थोरवे यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात नक्कीच ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

See also  पाषाण रोड वरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध...!

सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक असोसिएशन चे अध्यक्ष  ऍड. पांडुरंग थोरवे यांनी केले.  सूत्रसंचालन  पुणे बार असोसिएशन चे सचिव ऍड. सुरेखा भोसले यांनी केले व आभार  कार्यकारिणी सदस्य ॲड. अमोल भोरडे यांनी मानले. सदर कार्यक्रमास  उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील सेक्रेटरी – ऍड अमोल शितोळे, खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोबा तपासणीस ॲड.  शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले,  ऍड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ,ॲड. कुणाल अहिर , ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने न्यायाधीश व वकील बांधव उपस्थित होते.