नवी दिल्ली :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवार, १४ जून रोजी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील युवकांना मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती करून घेतलं जाणार आहे. या अग्निपथ योजनेची माहिती राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुखही उपस्थित होते.देशातील हजारो युवकांना सशस्त्र दलात काम करण्याची संधी मिळणार आहे. तरुणांसाठी सैन्यभरतीची ही सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे. या अग्निपथ योजनेअंतर्गत वर्षाला ५० हजार युवकांना सैन्यात भरती केलं जाणार आहे. युवकांना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार वर्ष भरती झालेल्या युवकांना देशाची सेवा करता येणार आहे. या चार वर्षाच्या सेवेनंतर युवकांना अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे.
या अग्निपथ योजनेची संपूर्ण माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले, अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. या योजनेअंतर्गत वर्षाला ५० हजार युवकांना भरती केलं जाणार आहे. यामध्ये युवक चार वर्षाची देशसेवा करू शकणार असून त्यांनंतर त्या युवकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. सैन्यात बदल करून अत्याधुनिक बनवणार आणि सैन्याला आकर्षक आर्थिक पॅकेज आणि सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच भारतीय सेनेला जगातील मजबूत सेना बनवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.