सुतारवाडीतील शुभम रणपिसे यांनी पटकवली सम्राट केसरी मानाची गदा.

0

सुतारवाडी :

सुतारवाडी येथील पैलवान शुभम राजु रणपिसे याने बोपखेल येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवत सम्राट केसरी मानाची गदा मिळवुन संपुर्ण सुतारवाडी गावाच्या नावलौकिकात भर टाकली. सुतारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आबा सुतार आणि भाजपा युवा नेतृत्व माजी स्विकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्यावतीने रोख रक्कम अकरा हजार रुपये देवुन सन्मानित करण्यात आले.

याची माहिती मॅक न्यूज ला देताना माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार म्हणाले की, सुतारवाडी गावाच्या शुभम रणपिसे या युवकाने सम्राट केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाचा किताब मिळवून गावाचे नाव मोठे केले आहे. या विजेतेपद मुळे त्याने युवकांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. भरपूर व्यायाम कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर हे विजेतेपद मिळवले आहे. त्याचा आदर्श घेऊन परिसरातील इतर युवकांनी देखील खेळांमध्ये नैपुण्य दाखवून आपले व आपल्या गावाचे नाव मोठे करावे असे आव्हान यानिमित्त करत आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबा सुतार, स्विकृत नगरसेवक शिवम सुतार, अमर रणपिसे, राजू सुतार, सखाराम सुतार, संतोष धनकुडे आदी उपस्थित होते.

See also  डॉ सागर बालवडकर यांच्या प्रयत्नांना यश , बालेवाडी मधील सोसायट्यांना मिळणार पाईप द्वारे गॅस.