पुणे महापालिकेचे कोविड लासिकरण साठी टास्क फोर्स मार्फत नियोजन.

0

पुणे :

जानेवारी अथवा फेब्रुवारी मध्ये कोरोनावरील लसीकरण होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महापालिकेने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडली असून प्रभागनिहाय ‘इलेक्शन पोलिंग’ च्या धर्तीवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव, डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी,आयएमएचे अधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.

लसीचे दोन डोस देण्यात येणार आहे. पहिल्या डोसनंतर अठ्ठावीस दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी निवडणुकीप्रमाणे प्रभागनिहाय बूथ रचना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी कोव्हीड लसीकरणाकरिता तयार करण्यात आलेल्या कोविड ऍपवर लोड करण्यात येत आहे. या ऍपवर नोंद झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यानंतर पन्नास वर्षे वयावरील जोखीमग्रस्त व्यक्तिंनाआणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

प्रत्येक बूथवर १ लस टोचणारा, दोन पर्यवेक्षक आणि एक सुरक्षाकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर नाव व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांना लसीकरणाचा दिनांक, वेळ याचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

 

See also  पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडी चा छापा.