चार राज्यातील भाजपाच्या विजयाचा बाणेर मध्ये विजयोत्सव साजरा.

0

बाणेर

बाणेर, बालेवाडी, औंध, सुस, महाळुंगे भाजपा वतीने उत्तरप्रदेश, मणिपुर, गोवा व उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवित यशाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरीकांनी एकत्र येवुन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजय उत्सव साजरा केला. यावेळी सर्वांनी गुलालाची उधळण करत पेढे व मिठाई देवुन शुभेच्छा दिल्या.

उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीनंतर देशातील नागरिक पुन्हा एकदा भाजपासोबत आहेत, हे सिद्ध झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील या विजयाची पुनरावृत्ती होईल. अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

या वेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन दळवी, उमा गाडगीळ, बाळासाहेब रानवडे, अनिल ससार, काळूराम गायकवाड, शशिकांत बालवडकर, रोनक गोटे, भाजपा पदाधिकारी, सक्रीय महिला मोर्चाच्या सर्व सभासद महिला, अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

See also  सुसगाव, पाषाण परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी...