शिवसेनेकडून सुस – म्हाळुंगे गावाला हक्काचा उमेदवार द्यावा पक्ष प्रमुखांकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी

0

बाणेर :

प्रभाग क्रमांक १३ मध्ये समाविष्ट झालेल्या सुस म्हाळुंगे गावामध्ये महापालिकेत समाविष्ट होण्या अगोदर शिवसेनेची सत्ता व जनतेतून निवडून आलेले दोन्ही सरपंच शिवसेनेचे असल्याने या ठिकाणी शिवसेनेचं चांगले वर्चस्व पहायला मिळते. म्हणूनच या सामाविष्ट गावामधील शिवसैनिकांना एक जागा उमेदवारीसाठी देण्यात यावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे, असे उपशहर प्रमूख राजेंद्र धनकुडे यांनी सांगितले.

पुढे बोलताना राजेंद्र धनकुडे म्हणाले की, या दोन्ही गावांत सोबत बाणेर मध्ये नेहमी शिवसेनेला साथ राहिली आहे. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असताना शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. फार मोठ्या प्रमाणात येथे शिवसैनिक असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये समाविष्ट झालेल्या सुस म्हाळुंगे गावास योग्य न्याय देण्याचे काम शिवसेनेकडून होईल. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुस, म्हाळुंगे, बाणेर या भागांमध्ये पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

तसेच बाणेर मध्ये देखील रोहिणी धनकुडे यांनी मागील वेळी निवडणूक लढवत चांगले मतदान घेतले होते.
महाविकास आघाडीत सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे वर्चस्व असलेला हा परिसर दोन जणांचा प्रभाग झाला असला तरी, या ठिकाणी शिवसेनेला हा प्रभाग सोडण्यात यावा अशी मागणी सर्व शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख व शिवसेना संपर्क नेते सचिन आहेर यांच्याकडे केली आहे. बाणेर, सुस, म्हाळुंगे, बालेवाडी, औंध तसेच पाषाण बावधन परिसरात स्वबळावर शिवसेनेची लढण्याची तयारी पूर्ण झाली असून, पक्ष आदेश आल्यानंतर शिवसैनिक आक्रमकपणे सत्ता बदलासाठी प्रयत्न करतील, असे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी मॅकन्यूज.लाईव्हशी बोलताना सांगितले.

See also  वसुंधरा अभियान बाणेर चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा