बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम

0

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे बाजीराव श्रीपती मार्गावर असलेल्या फेडरेशन ग्राउंड वर प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या हस्ते झाला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पटांगणाच्या भिंतींवर “पर्यावरण प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रमबचाव” विषयक विविध चित्रे काढून लोकजागृतीचा कार्यक्रम फेडरेशन तर्फे राबविण्यात आला आहे. फेडरेशनच्या सदस्या असलेल्या अस्मिता करंदीकर आणि शुभांगी चपाटे यांनी हा प्रकल्प राबविला. थिम व रंगसंगती ठरविणे, चित्रं काढण्यासाठी स्वयंसेवक निवडणे यासर्व कामात दोघींनी पुढाकार घेऊन प्रकल्प यशस्वी केला. बालेवाडीतील अनेक मुलांनी व तरुणांनी यात सहभाग घेतला होता.

फेडरेशनच्या सदस्यांनी पुढे येऊन या उपक्रमाला सढळ हाताने आर्थिक मदत केली. बाणेर-बालेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मंदार रारावीकर यांनी पक्षांची पाच घरटी फेडरेशनला भेट दिली. या ग्राउंड वर देशी झाडे लावली आहेत. त्यावर हि घरटी लावण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी सर्वांचे कौतुक केले व फेडरेशनला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.

फेडरेशन तर्फे अशोक नवाल, इंद्रजित कुळकर्णी, परशुराम तारे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
ऐडव्होकेट माशाळकर, मोरेश्वर बालवडकर, आंबारिश देशपांडे, शकिल सलाटी, विजय गायकवाड, कौस्तुभ करंदीकर आणि अभिषेक उपाध्याय हे यावेळी उपस्थित होते.

See also  आरोग्य हीच संपत्ती' या तत्वावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणीवर भर : सुनील केदार