बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने पीडीसीसी बँक संचालक पदी निवड झालेल्या संचालकांचा सत्कार…!

0

बाणेर :

बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाणेर यांच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल प्रदीप कंद आणि सुनिल चांदेरे यांचा सत्कार बाणेर येथील संस्थेच्या शाखेत करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जाते. आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल निवड झालेल्या संचालकाचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. निवडून आलेल्या संचालकांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा सन्मान आयोजित केला आहे.

सत्काराला उत्तर देताना निवडून आलेले संचालक सुनील चांदेरे यांनी सांगितले की, संचालक पदी निवडून येण्याकरीता डॉ. दिलीप मुरकुटे यांनी मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते.

सत्कारमूर्ती प्रदीप कंद यांनी सांगीतले की, डॉ. दिलीप मुरकुटे हे नेहमीच चांगले मार्गदर्शन करतात.त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने निवडून येण्यास मदत झाली. भविष्यात त्यांना हवे तेंव्हा सहकार्यास नेहमीच तत्पर राहू.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप मुरकुटे, चेअरमन विजय विधाते, व्हाईस चेअरमन शशिकांत दर्शन संचालक रामदास विधाते, ॲड. पांडुरंग थोरवे, राजू शेडगे, संजय ताम्हाणे, शिवराज बालवडकर, माजी चेअरमन लहू सायकर, किसन बालवडकर, अतुल अवचट, पिरंगुट शाखाध्यक्ष राम गायकवाड, विनोद चाकणकर अमित कंधारे (पुणे जिल्हा नियोजन समिती), बंडू मेंगडे, नंदकुमार बिडवई (वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे शहर), अंकुश उभे (संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना),समीर रजपूत (सहाय्यक व्यवस्थापक पिडीसीसी), निहाल सायकर, राहुल शिंदे, मेहबूब शेख, संतोष भोसले, आदि उपस्थित होते.

See also  अमोल बालवडकर क्वीक रिस्पॉन्स टीम" लवकरच आपल्या सेवेत.