१० जानेवारी पासून पुण्यातील गुंठेवारीची प्रक्रिया सुरू होणार : महापौर मुरलीधर मोहोळ

0

पुणे :

पुणे शहर व जिल्ह्यात गुंठेवारीचा प्रश्न खूप दिवस झाले प्रलंबित आहे. त्यावर आज गुंठेवारी संदर्भात पालिकेत बैठक झाली. त्यात 10 जानेवारी पासून पुणे जिल्ह्यातील गुंठेवारीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले,महापालिकेच्या माध्यमातून शहरातील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मुरलीधर मोहोळ म्हणाले. गुंठेवारी प्रस्ताव एकत्र करण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत आम्ही राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकार यावर लवकरात लवकर तोडगा काढेल असे आम्हाला वाटते.

महाराष्ट्र राज्यातील गुंठा गुंठा क्षेत्रावर दिनांक 31 12 2020 पर्यंत झालेली अनुकृधित बांधकामे
नियम धीन करण्यासाठी 18/5/2021 रोजी शासन निर्णय झाला होता. त्यानुसार पुणे महानगर पालिकेतील प्रभाग स्तरावर क्षेत्रीय कार्यालय घरावर स्थापत्य विभागामार्फत अशी बांधकामे नियमित करण्याचे काम महापालिका सभा ठराव क्रमांक एक दिनांक 1 4 2003 व ठराव क्रमांक 182 दिनांक 2002 च्या नंतर साधारण 2007 पर्यंत करण्यात आलेले आहे, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

See also  पाटील इस्टेट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प चार वर्षांत पूर्ण केला जाईल : राजेंद्र निंबाळकर