योगीराज पतसंस्थेचा स्टाफ हा एकत्रित कुटुंब असल्याप्रमाणे : ज्ञानेश्वर तापकीर

0

बाणेर :

सहकार क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेनी वार्षिक ४०० कोटीची उलाढाल १ कोटी ९० लाखाचा नफा मिळवत आपली वाटचाल २५ वर्ष सुरु ठेवली आहे. योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ आणि पतसंस्थेतील स्टाफ नियोजनबद्ध काम करून पतसंस्थेच्या यशामध्ये हातभार लावत असतात. संस्थेचे संचालक मंडळ आणि स्टाफ हा एकत्रित कुटुंब असल्याप्रमाणे काम करत असतात. म्हणूनच संस्थेच्या ऑफिसमधील स्टाफचा वाढदिवस देखील सर्वांसोबत साजरा केला जातो. संस्थेतील स्टाफ संध्या यादव यांचा वाढदिवस त्यांचा सन्मान करून सर्वांसोबत साजरा करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना योगिराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेच्या जडणघडणीमध्ये संस्थेत काम करणाऱ्या स्टाफचा मोलाचा वाटा असतो संस्थेतील ठेवीदारांन बरोबर जपलेला विश्वास यामुळेच संस्था यशाची शिखरे पार करत आहे. योगीराज पतसंस्थेचे कुटुंब संस्थेतील स्टाफचा वाढदिवस एकत्रितरित्या साजरा करून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम सगळे एकत्र येऊन करत आहेत. संस्थेने केलेल्या चांगल्या कामामुळेच संस्थेने समाजात मानाचे स्थान मिळविले आहे. विविध मान्यवर नेहमीच संस्थेत येऊन भेट देत असतात.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्धव पटेल, कॉसमॉस बँकेचे शाखा व्यवस्थापक भोज साहेब, असिस्टंट मैनेजर सोनवणे मैडम, ऑफिसर विनायक शिंदे, आर बी एल बँकेचे असिस्टंट मैनेजर सचिन रेवने, धुमाळ साहेब, उद्योजक प्रभाकर पेंढारकर, आणि योगीराज पथसंस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होता. मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गंगणे यांनी सगळ्यांचे आभार मानले.

See also  युवासेना शिवसेना यांच्या वतीने सुतारवाडी भागात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी