बाणेर येथील स्वराज्य प्रतिष्ठान च्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते.

0

बाणेर :

नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या विकास निधीतून बाणेर भागातील नागरिकांसाठी तीन एकरांवर पुणे महानगरपालिकेचे पहिले भव्य क्रीडा उद्यान उभारण्यात येत आहे. या उद्यानात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच या निमित्त मल्लखांबाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक उपस्थित नागरिकांसाठी दाखविण्यात आले. परिसरातील टेकड्यांवर वृक्षलागवड करून हिरवळ पसरवणाऱ्या वसुंधरा अभियानाचा विशेष सत्कार आणि परिसरातील एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलांचा व राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रीडांगणावर पाचशे मीटर चा जॉगिंग ट्रॅक आणि चौदा प्रकारचे खेळांचे मोफत प्रशिक्षण स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने दिले जाणार आहे. गोरगरीब मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होऊन चांगले खेळाडू तयार व्हावे असा हेतू त्यामागे आहे.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरसेविका स्वप्नाली सायकर करत असलेल्या कामाचं कौतुक करताना सांगितले की, नागरिकांच्या व्यक्तिगत गरजांकडे लक्ष देण्याचे काम या भागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करत आहेत. सेवा हेच कर्तव्य समजून नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी चांगले क्रिडांगण उभे केले. गोरगरीब मुलांना विविध खेळांचे चांगल्या प्रशिक्षिका द्वारे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. येथे प्रशिक्षण घेऊन चांगले खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे.

यावेळी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सांगितले की, मातीतल्या खेळाची नाळ जोडली जावी, परिसरात चांगले खेळाडू तयार व्हावेत, या हेतूने स्वराज्य प्रतिष्ठान वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या भागात चांगले खेळाडू तयार होऊन परिसराचा नावलौकिकात भर पडणार आहे.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, मनसेचे रविंद्र गारुडकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, उमा गाडगीळ, आशिष ताम्हाणे, नितीन रणवरे, सचिन दळवी, अनिकेत मुरकुटे तसेच बाणेर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

See also  पाषाण परिसरातील संध्या नगर येथे अज्ञात गुन्हेगारांकडून गाड्यांची तोडफोड.

बाणेर महोत्सवसाठी पाच ते सहा हजार नागरिकांनी प्रत्येक दिवशी भेट दिली आणि विविध खेळांचा तसेच खाद्यपदार्थांचा आनंद लुटला.