बाणेर मधील शिवसेनेच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी.

0

पुणे :

बाणेर येथे शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वच राजकीय पक्षाच्या तसेच विविध सोसायट्यांचे चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी विविध विषयांवर गप्पा गोष्टी चा मनमुराद आनंद नागरिकांनी घेतला. शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दिवाळी फराळाच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांचे महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्याने राजकीय खेळीमेळीचे वातावरण यावेळी पाहायला मिळाले.

यावेळी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, उद्योजक गणपत मुरकुटे, बाणेर नागरी पतसंस्थेचे चेअरमन विजय विधाते ,रामदास विधाते, योगीराज पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र मुरकुटे, अर्जुन शिंदे, अर्जुन ननवरे, जगन्नाथ धनकुडे, सुधाकर धनकुडे, हनुमंत मुरकुटे, लहू बालवडकर, शिवसेना शहर संघटक नितीन पवार, शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे, संजय निम्हण, अशोक नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष महेश सुतार, शिवसेना जिल्हा संघटिका ज्योती चांदेरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, काँग्रेसचे जीवन चाकणकर , दत्ता जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तापकीर, साम्राज्य ग्रुपचे मंदार पोरे , मंदार रारावीकर, अजित भावे, डॉक्टर जनार्दन कदम, देशमुख काका, निलेश निम्हण, नाना वाळके, अक्षय विधाते, शैलेश निम्हण, ललित निम्हण, महेंद्र धनकुडे, सुहास धनकुडे ,राहुल धनकुडे ,विराज धनकुडे, राजू धनकुडे, विजय धनकुडे, गोरख बालवडकर, दत्तात्रय रानवडे, पिंटू डोंगरे, राहुल आरगडे आदी उपस्थित होते.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाव भेट दौऱ्या दरम्यान जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या....  समस्या सोडवण्याचे राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे यांनी दिले आश्वासन.