एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे : अनिल परब

0

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर या असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. ‘एसटीच महामंडळाची राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी लगेच पूर्ण होण्यासारखी नाही.

विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणे हायकोर्टा समोर मांडावे. आम्ही चर्चा करायला तयार आहोत,’ असे परब माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तसेच कामावर या नाही तर कारवाईला सामोरे जा, असा इशाराही परबांनी कामगारांना दिला आहे. कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाकडून भडकविलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामगारांच्या नुकसाची जबाबदारी नेते घेणार नाही, असे सूचक विधानही परबांनी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाकडून भडकवलं जात असल्याचा आरोपही परबांनी यावेळी सांगितलं. तर काही एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याची तयारी दर्शवली आहे. तर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाणार असल्याचं आश्वसन देखील त्यांनी दिले आहे. हायकोर्टाच्या कमिटिसमोर म्हणणे मांडावे.

See also  कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला राज्यशासनाची ५०,०००/- रूपये मदत