शिवसेना कोथरूड विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्यावतीने पाषाण, सुतारवाडी, पंचवटी, बावधन मध्ये भव्य किल्ले स्पर्धा

0

सुतारवाडी :

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, बावधन या भागाकरिता दिवाळीनिमित्त १८ वर्षाखालील मुलांसाठी, तसेच सामूहिक पणे सोसायटीतील नागरिकांसाठी शिवसेनेचे कोथरूड विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्यावतीने भव्य अशा किल्ले स्पर्धा भरविण्यात आल्या आहे. या स्पर्धा दोन विभागात विभागल्या गेल्या असून वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपामध्ये या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

स्पर्धेची माहिती देताना शिवसेनेचे कोथरुड शाखेचे विभागप्रमुख संतोष तोंडे यांनी सांगितले की, बऱ्याच काळापासून कोरोना च्या पादुर्भाव मुळे आपल्याला आपले सण साजरे करता आले नव्हते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळेच यावेळी ची दिवाळी आनंददायी आणि उत्साही वातावरणात साजरी केली जावी या हेतूने भव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धेतील बक्षिसे मिळवावी असे आव्हान करत आहे.

स्पर्धेचे स्वरूप :

वैयक्तिक किल्ले बनविणे : (एका व्यक्तीनेच किल्ला बनविणे अपेक्षित वयोमर्यादा १८ वर्षे)

प्रथम क्रमांक : ७००० रू आणि सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : ५००० रू आणि सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : ३००० रू आणि सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक. : १००० रू आणि सन्मानचिन्ह

सामूहिक किल्ले बनविने : (सोसायटीतील सभासद, मंडळातील कार्यकर्ते मिळून किल्ला बनवू शकतात)
प्रथम क्रमांक : १५००० रू आणि सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : ११००० रू आणि सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : ७००० रू आणि सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक. : ३००० रू आणि सन्मानचिन्ह

स्पर्धेचे नियम :
१. विटा दगड मातीचा वापर करून किल्ला बनविणे, पीओपी चा वापर करु नये.
२. किल्ला निरीक्षणा वेळी येणाऱ्या प्रेक्षक आस किल्ल्या बद्दल ची माहिती सांगणे.
३. किल्ला आपापल्या जागी बनवावा.

किल्ल्याचे निरीक्षण ५ नोव्हेंबर आणि ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता खालील नंबर वरती संपर्क साधावा : ७०४०५५६६५२, ९९७५९८३५३१, ७९७२२१६६१२

See also  बालेवाडी फाट्यावरील सेक्स रॅकेटचा भांडाफोड चतुःशृंगी पोलिसांची कारवाई.