पुण्यातील उपायुक्तांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं.

0

पुणे :

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील उपयुक्तांवर मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. जात पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भांडाफोड केला आहे. एसीबीने अचानक केलेल्या या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

नितीन चंद्रकांत ढगे हे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. तक्रारदाराने तक्रार दाखल करताच उपयुक्तांचा भांडाफोड करण्यासाठी एसीबीने एक सापळा रचला. यानुसार नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं.

यानंतर नितीन ढगे यांच्या घरी देखील सर्च ऑपरेशन करण्यात आलं. या सर्च ऑपरेशनमध्ये ढगे यांच्या घरी तब्बल 1 कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे. तसेच दीड कोटीहून अधिक रकमेचे कागदपत्रे देखील एसीबीला मिळाली आहेत.

दरम्यान, वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढगे सध्या एसीबीच्या ताब्यात आहेत. एसीबीचे अधिकारी याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

See also  बाहेर फिरायला जाणाऱ्या ना १५ दिवस क्वारंटाइन करणार : अजित पवार यांचा इशारा