भाजप च्या नियोजनातील अभावामुळे दीड रुपयाच्या सिरिंग्ज साठी लसीकरण बंद : प्रशांत जगताप

0

पुणे :

गेल्या काही काळापासून संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना कोरोना प्रतिबंधक लसीच्या रुपात काहीसा दिलासा आपल्याला मिळाला.

जगभरातील सर्व देश जास्तीत जास्त नागरिकांना लस देऊन त्यांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असताना भारतातील मोदी सरकार मात्र नागरिकांना पुरेसा लसींचा पुरवठा करण्यास सपशेल अपयशी ठरले असल्याचे प्रशांत जगाताप यांनी म्हटले आहे. आधीच मोदी सरकारकडून लसींचा पुरवठा अपुरा होत असताना पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी उपलब्ध लसी देण्यासही अपयशी ठरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

लसीकरणासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करत असताना उपलब्ध असलेल्या लसी देण्यासाठी पुणे महानगरपालिका लस टोचण्यासाठी लागणाऱ्या सिरिंग्ज (सुई) पुरवण्यात अपयशी ठरली आहे. तब्बल 8,500 हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी पुणे महानगरपालिका आपल्या नागरिकांना लस देण्यासाठी सध्या सिरिंग्ज पुरवू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी म्हणजे व्यवस्थेचं वाटोळं करणारी संघटना आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
पुणे शहरातील अनेक डिस्ट्रिब्युटर्स, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मधून देशभर सिरिंग्जचा पुरवठा करण्याची क्षमता असतांना या डिस्ट्रिब्युटर्सकडे भाजपच्या नेत्यांची एवढी सुद्धा पत नाही की ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिकेला सिरिंग्ज उपलब्ध करून देऊ शकतील? असा प्रश्न उपस्थित करत अवघ्या 1 ते 1.50 रुपयांच्या सिरिंग्जसाठी सुद्धा राज्य सरकारवर अवलंबून असतील तर भाजप महानगरपालिका सांभाळू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा शब्दांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळे पुणे महानगरपालिका दिवाळखोरीत निघत असल्याने अवघ्या एक रुपयात मिळणारी सिरिंगस विकत घेण्याची पुणे महानगरपालिकेची ऐपत नसेल तर पुणेकर नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सिरिंग्ज देण्यास तयार असल्याचे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

See also  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील चार बड्या हॉटेलवर कारवाई .